4k सामाचार
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )शिक्षण प्रेमी कै. विठाबाई शिवराम म्हात्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक वारसा जपणारे कलाकार यांचा विशेष गुणगौरव कार्यक्रम आवरे गावातील प्रसिद्ध अंनतभूवन सभागृहात पार पडला. उत्कृष्ट कलाकार सम्राट नित्यानंद म्हात्रे यांनी सी बी एस सी परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल तसेच कौस्तुभ आल्हाद म्हात्रे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्ह्यात सतरावा क्रमांक मिळवल्याबद्दल या दोन्ही गुणवंतांचा सत्कार उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन करण्यात आला.

तसेच आवरे गावातील सांस्कृतिक वारसा जपणारे कलाकार यांचा विशेष गौरव कारण्यात आला या प्रसंगी गणेशप्रसाद गावंड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कुठल्याही प्रकारची कला आपल्या सोबत जोपासावी व प्रगती करावी.

सत्कारमूर्ती सम्राट नित्यानंद म्हात्रे याने आपले मनोगत व्यक्त करत आपल्याला भविष्यात शास्त्रज्ञ या क्षेत्रात काम करायचं आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड भूषण संगीत विशारद शिवभक्त गणेश प्रसाद गावंड हे होते.यावेळी प्रभाकर म्हात्रे,एच के गावंड, प्रभाकर गावंड, पद्माकर म्हात्रे,महेश म्हात्रे, डी ए गावंड, देविदास म्हात्रे, प्रियांका म्हात्रे,जगदीश गावंड, विलास म्हात्रे, संजय गावंड,पद्माकर म्हात्रे आदी मान्यवर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक एम एस म्हात्रे यांनी तसेच स्वागत गीत नरेश गावंड व आभार प्रदर्शन डी ए गावंड यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन सेवानिवृत्त आदर्श शिक्षक व केंद्रप्रमुख एम एस म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व आवरे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
