नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.

4kNews कामोठे दि. 10
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे  यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी  फते खान सोंडे व युवतीसेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांच्या नियुक्या जाहीर केले आहेत.



शिवसेना उरण शहर शहराच्या वतीने आयोजित जाहीर कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव  यांच्या शुभहस्ते हे नियुक्त पत्र देऊन या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे, तसेच जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नियुक्ती पत्रात संघटना बांधणीसाठी व पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

यावेळी महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, उपजिल्हाप्रमुख  नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे, तालुका संपर्कप्रमुख  दीपक भोईर, शहर प्रमुख  विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे,शिवसेना ग्राहक कक्ष प्रमुख उरण शहर – संदीप जाधव,उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका भावना म्हात्रे,पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोकण ग्रुप तर्फेही त्यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top