करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!

4kNews कामोठे दि. 9
करंजाडे येथे पोस्ट ऑफिस सुरू व्हावे, ही मागणी आणि इच्छा आदरणीय श्री. चंद्रकांत गुजर साहेबांनी व्यक्त केली होती. जनतेच्या मूलभूत सुविधांशी निगडित हा विषय केवळ मागणीपुरता न ठेवता, तो प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान, करंजाडे-पनवेल यांच्या वतीने आज सरपंच श्री. मंगेश शेलार यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन देण्यात आले.


यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत गुजर, उपाध्यक्ष श्री. रमेश आगरे, सचिव श्री. दिनेश धामणस्कर, सौ. नेहा मोरे तसेच सभासद धुमाली नरळकर, वैभवजी मुरुडकर, पेडामकर आणि इतर बांधव उपस्थित होते. 🙏


या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच श्री. मंगेश शेलार यांनी पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, एका आठवड्यात याबाबत माहिती देतो, असे स्पष्ट सांगितले आहे.
👉 करंजाडेला सुविधा हव्यात, आश्वासने नाही—आणि त्यासाठी पाठपुरावा करणे हीच आमची भूमिका आहे!
राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याचे माध्यम असले पाहिजे. करंजाडेच्या विकासासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top