नवीन बातम्या
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ५० हजार केळींचे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्याकडून फराळरूपी सेवाभावी उपक्रम
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथे शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोफत मल्टी स्पेशालिटी महाआरोग्य शिबिर
*वलवली शालेय मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन*
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आषाढी एकादशी निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे फराळ व तुळस वाटप
कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) लिंक रोडच्या विकासासाठी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांचे महापौरांना निवेदन
Gutenberg Times: WordPress 7.1 Beta 3, AI in Action at #WCUS, Playground UI testing and more — Weekend Edition 370
Aaron D. Campbell: WP2Shell: Coordination Was Part of the Protection
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत तिन्ही शाळेंनी मिळवला दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश


पनवेल दि.१३ (संजय कदम) : सालाबादप्रमाणे यंदाही दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पनवेल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत तिन्ही शाळेंनी दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे.


पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत केली जाते. यातूनच विद्यार्थी मनापासून शिक्षण घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतात. यंदाही  पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल येथील याकूब बेग हायस्कुलचा दहावीचा निकाल ९६.४ टक्के लागला असून एकूण १३९ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यापैकी १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये १९ विद्यार्थी उत्कृष्ठ, ४९ विद्यार्थी प्रथम क्षेणीत व ५३ विद्यार्थी द्वितिय क्षेणीत पास झाले आहेत. त्यामध्ये आंबेकर सादिया आसिफ हिने ९२.४ टक्के मिळवून प्रथम, खान शाहीन फारुख ९०.२ टक्के द्वितीय तर दळवी आशिया हर्षद ८६.४ टक्के मिळवून शाळेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

तसेच तळोजा येथील नॅशनल उर्दू हायस्कुलचा निकाल ९८.४ टक्के लागला असून शाळेतून १०८ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये २० विद्यार्थी उत्कृष्ठ, ३३ विद्यार्थी प्रथम क्षेणीत व ४७ विद्यार्थी द्वितिय क्षेणीत पास झाले आहेत. यात पटेल मारियम इलियाज ९७.६ टक्के मिळवून प्रथम, खामकर रिझा जुबेर ९२.२ टक्के द्वितीय तर खामकर जैनाब अब्दुल सलाम ९१ टक्के मिळवून शाळेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

त्याचप्रमाणे तालुक्यातील बारापाडा येथील अँग्लो उर्दू हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला असून यात अब्दुल्ला मुझाबीर रसालकर व नौफ तौसिफ़ दळवी ८७.४ टक्के तर नवाज अन्वर लांबतुरे ८६.४ मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यासर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी, चेअरमन आसिफ करेल, उपाध्यक्ष मुकीदभाई काझी, सचिव नूर पटेल, आलिम पटेल यांनी अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व शाळेतील विद्याथ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top