उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत इयत्ता ५ वी ते १० वी मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सारिका पाटील -बोकडविरा, चंद्रविलास घरत भेंडखळ, निलेश ठाकूर शिवाजी नगर यांच्या मार्फत गणवेश देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य साळुंखे बी.बी. यांनी केले. विविध स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत असे प्रतिपादन केले.

प्रसंगी उपस्थित प्राचार्य साळुंखे बी.बी. उपमुख्याध्यापिका थोरात एस.डी,पर्यवेक्षिका बाबर एस. एम, पाटील एस.एस,सारिका पाटील, चंद्रविलास घरत, निलेश ठाकूर, सतीश घरत, प्रांजल भोईर, विकास शर्मा, निलेश झावरे, नितिन साखरे, व सेवक वृंद यांचा सन्मान करण्यात आला. त्या नंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले.

या वेळी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शालेय समिती पुनर्गठीत करण्यात आल्या. विविध समित्यांची माहिती विभाग प्रमुखांनी दिली. शाळा व्यवस्थापन – गावंड व्ही. व्ही., माता पालक संघ- खारपाटील एम.एम., पालक शिक्षक संघ- पाटील पी.ए. व शालेय पोषण आहार नाईक एस.डी,नवभारत साक्षरता – पाटील एच. एन., SQAAF व गुरुकुल म्हात्रे ए. आर. तंबाखू नियंत्रण समिती यांची निवड झाली.यावेळी नितीन साखरे,निलेश झावरे वैद्यकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.सर्व समिती सभेसाठी पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता.
