नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव

4knews दि. 25/12/25

पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत आंतरशालेय फेरीचे पारितोषिक वितरण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल, कामोठे येथे उत्साहात पार पडले.या आंतरशालेय फेरीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्व सादर केले होते. त्यामधून निवड झालेल्या एकूण २३ विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर आत्मविश्वासाने विचार मांडून उपस्थितांची दाद मिळवली.


        यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नाली यांनी सांगितले, आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना विचार मांडण्याचे व्यासपीठ मिळते. अशा स्पर्धांमुळे आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित होतात. कोशिश फाऊंडेशनने घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले कि, आज सन्मानित झालेले विद्यार्थी हे उद्याचे सक्षम वक्ते आणि जबाबदार नागरिक आहेत. या स्पर्धेमुळे मुलांमध्ये धाडसाने बोलण्याची क्षमता निर्माण होत असून, हेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शाळा प्रशासनाने कोशिश फाऊंडेशन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करत, विद्यार्थ्यांना मिळणारे हे व्यासपीठ त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. या आंतरशालेय फेरीतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील स्तरावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाल्याचे वातावरणातून स्पष्ट झाले. यावेळी युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, मनोहर शिंगाडे, राहुल बुधे, अमित गोडसे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top