4kNews कामोठे दि. 6खारघर (प्रतिनिधी) : खारघरवासीयांच्या आग्रहास्तव आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, खारघर यांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी ‘दिवाळी संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आपल्या सुमधुर आवाजातून लोकप्रिय गीतांची सुरेल मैफल सादर करणार आहेत. शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० […]
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
4kNews कामोठे दि. 6 न्यू पनवेल (प्रतिनिधी) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) फॅशन अँड अपेरल डिझाईन आणि इंटीरियर डिझाईन विभागांतर्फे ४ नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी बाजार’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. […]
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी
4kNews कामोठे दि. 6पनवेल (प्रतिनिधी) : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याबरोबरच विनाचौकशी बंद करण्यात आलेली पात्र रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. […]
तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर उलमा बोर्ड महिला विंग आक्रमक सात दिवसांत पाणीपुरवठा सुधारण्याचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे सिडकोचे आश्वासन
4kNews कामोठे पनवेल, दि. 6 (वार्ताहर) : तळोजा फेज १, फेज २ आणि खारघर परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगने सिडको प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. रायगड भवन येथे सिडकोच्या जलविभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन महिलांनी अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत नाराजी व्यक्त केली. सात दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन […]
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
4kNews कामोठे दि. 5पनवेल (प्रतिनिधी) : दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी, विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लुइझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने दिव्यांग क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. पुणे येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा सन्मान देण्यात आला. विशेष म्हणजे, साईनाथ पवार हे स्वतः दिव्यांग असूनही त्यांनी शारीरिक मर्यादांवर […]
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
4kNews कामोठे दि. 5पनवेल (प्रतिनिधी) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे पनवेल शहराध्यक्ष प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन ९ नोव्हेंबर २०२६ रोजी साईनगर, जुने पनवेल येथील गणेश मंदिरात करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे आणि युवा नेते अनिकेत संसारे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. […]
उरणचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची विभागप्रमुखपदी पदोन्नती
4kNews कामोठे पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारीउरण, दि. 5 (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्याचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुखपदी (एचओडी) पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उरणसह रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. या पदोन्नतीबद्दल डॉ. शेख यांनी महाविद्यालयाचे […]
उरण बायपाससाठीच्या संघर्षाला यश; गोपाळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार
4kNews कामोठे विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती; सामाजिक व विकासकामांतील योगदानाचा गौरवउरण, दि. 5 (विठ्ठल ममताबादे) : उरण बायपास रस्त्याच्या निर्मितीसाठी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा आणि संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उरण बायपास रोड, कोटनाका येथे उत्साहात पार पडला. उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे […]
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
4kNews कामोठे उरण, दि. ३१ (विठ्ठल ममताबादे) : खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी सुरू असलेले गेट बंद आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाची […]
राहुल शिवाजी बनसोडे यांचा ‘बनसोडे एंटरप्रायजेस’च्या माध्यमातून बौद्ध वस्तूंचा व्यवसाय
बुद्धमूर्तींपासून धम्मसाहित्यापर्यंत विविध वस्तू उपलब्ध; सांगली आणि नवी मुंबईत व्यवसायाचा विस्तार
4kNews कामोठे दि. 26 नवी मुंबई (प्रतिनिधी) : बौद्ध संस्कृती, धम्मपरंपरा आणि सामाजिक प्रबोधनाशी संबंधित साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राहुल शिवाजी बनसोडे हे ‘बनसोडे एंटरप्रायजेस’च्या माध्यमातून बौद्ध वस्तूंचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायात बुद्धमूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, फोटो फ्रेम, बॅज, धम्मध्वज, पंचशील ध्वज, पताका, दुपट्टे, निळ्या टोप्या, फेटे, पुस्तके, टी-शर्ट, जॅकेट, साड्या […]
