4k समाचार दि. 14
पनवेल (प्रतिनिधी) सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेजमध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठ स्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक चार कांस्य पदक पटकाविले.

या स्पर्धेत मुलांनी इपी प्रकारात कांस्य पदक व सेबर प्रकारात कांस्य पदक तर मुलींनी सुद्धा इपी प्रकारात कांस्य पदक व सेबर प्रकारात कांस्य पदक मिळवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच या स्पर्धेत विदांत नाईक, करण खेडकर, अभिषेक चव्हाण, आदित्य पांडा, श्रेया जाधव , कशिश पाटील, हर्षिता चौहान आणि नम्रता वाहुलकर यांनी सांघिक विजेतेपद मिळवले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील, जिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील यांनी विद्यार्ध्यांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले.
