नवीन बातम्या
How to Create an Online Course Marketplace in WordPress (Multiple Instructors)
WordPress.org blog: WordPress Signs the Open Weights and American AI Leadership Letter
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार; ५० हजार रुपयांचे बक्षीस
पत्रकारांनी घेतली पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी भूखंडाची मागणी
कळंबोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन
Open Channels FM: X vs Nitter and XCancel, AI Middleware, and Accelerated Online College Degrees
आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर; पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन
‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा
३० ऑगस्टला पनवेलमध्ये माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे विशेष व्याख्यान
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना पनवेलतर्फे मोफत बस सेवा

पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी लोकनेते रामशेठ ठाकूर प्रमुखपदी आमदार महेश बालदी यांची नियुक्ती


4knews दि. 25/12/25


पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवडणूक प्रभारीपदी तर आमदार महेश बालदी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दैदिप्यमान विजय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी हे समीकरण कायम राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पनवेल महापालिकेत भाजपच्या मोठ्या विजय होणार आहे. 


          आपल्या संघटन कौशल्याने भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या दोघांच्याही नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. पक्षाने टाकलेला विश्वास प्रामाणिक मेहनत व नियोजनातून निश्चितच सार्थ ठरवू तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांच्या सहकार्याने ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्याचा संकल्प लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top