नवीन बातम्या
गव्हाण येथील बंद खाणीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन
खानावळे येथील नवरात्रोत्सवात मंगेश लबडे यांनी घेतले देवीचे दर्शन
पनवेलमध्ये तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद
एसटी स्टँड परिसरातून ताब्यात; बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन
क्राफ्ट पेपरच्या दरवाढीने कोरुगेटेड बॉक्स उद्योग अडचणीत  बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारण्याचे ग्राहकांना आवाहन; दर स्थिर ठेवण्याची WICMA ची मागणी
मुंबई जीपीओमध्ये ‘फिलॅटली दिवस’ उत्साहात साजरा
डाक तिकिटांतून भारताचा इतिहास, संस्कृती व जैवविविधतेची ओळख
झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगचा आयपीओ १५ ऑक्टोबरपासून खुला होणार प्रति शेअर किंमतपट्टा १४३ ते १५१ रुपये; १९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीची संधी
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात
‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन
OpenStation Blog: I Deleted 168,000 Lines of Comments. My AI Agent Didn’t Notice

पनवेलमध्ये तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद
एसटी स्टँड परिसरातून ताब्यात; बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन

4kNews कामोठे दि. 16

पनवेल (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान तिहेरी हत्याकांडातील पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दीपक फतेसिंग सुरडकर (वय ४४, रा. सोमठाणा, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव असून, त्याला पुढील कारवाईसाठी बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.



९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पनवेल एसटी स्टँड परिसरात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. यावेळी हाताला जखम झालेला एक संशयित आढळला. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला आपली ओळख सांगण्यास टाळाटाळ केली. पुढील विचारपुशीत त्याने जमिनीच्या वादातून आई सरस्वती (७५), भाऊ संजय (४८) आणि पुतण्या रजित (२१) यांची हत्या केल्याची माहिती दिली.



या माहितीची पडताळणी केल्यानंतर तो बुलढाणा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top