नवीन बातम्या
Matt: RIP Eric Binnion
क्राफ्ट पेपरच्या दरवाढीने कोरुगेटेड बॉक्स उद्योग अडचणीत  बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारण्याचे ग्राहकांना आवाहन; दर स्थिर ठेवण्याची WICMA ची मागणी
मुंबई जीपीओमध्ये ‘फिलॅटली दिवस’ उत्साहात साजरा
डाक तिकिटांतून भारताचा इतिहास, संस्कृती व जैवविविधतेची ओळख
झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगचा आयपीओ १५ ऑक्टोबरपासून खुला होणार प्रति शेअर किंमतपट्टा १४३ ते १५१ रुपये; १९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीची संधी
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात
‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन
OpenStation Blog: I Deleted 168,000 Lines of Comments. My AI Agent Didn’t Notice
Matt: Neal Stephenson Live!
Open Channels FM: Balancing AI Efficiency Costs and Value in Markdown Data and Open Source Security

क्राफ्ट पेपरच्या दरवाढीने कोरुगेटेड बॉक्स उद्योग अडचणीत  बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारण्याचे ग्राहकांना आवाहन; दर स्थिर ठेवण्याची WICMA ची मागणी

4कन्यूज कामोठे
मुंबई, दि. 14 (अजित मोहिते) : क्राफ्ट पेपरच्या किमतींमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे कोरुगेटेड बॉक्स उत्पादकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कच्च्या मालाचा खर्च वाढत असताना तयार बॉक्सच्या विक्रीदरात पुरेशी वाढ होत नसल्याने उत्पादकांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी बॉक्सच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ स्वीकारावी आणि पेपर मिल्सनी दर स्थिर ठेवून देशांतर्गत बाजारात पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (WICMA) केली आहे.



मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत WICMA चे अध्यक्ष श्लोक केडिया यांनी उद्योगातील अडचणी मांडल्या. क्राफ्ट पेपरच्या दरवाढीमुळे कोरुगेटेड बॉक्सच्या किमतींवर अंदाजे १५ ते १८ टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, ग्राहकांसोबतचे पुरवठा करार आणि विक्रीदर तातडीने बदलणे शक्य नसल्याने उत्पादकांना वाढलेल्या खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.



दरवाढीत पारदर्शकता आवश्यक
आयात कच्चा माल, वाहतूक, कोळसा, कागदनिर्मितीसाठी लागणारी रसायने तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी यांचा क्राफ्ट पेपरच्या किमतींवर परिणाम होत असल्याचे केडिया यांनी स्पष्ट केले. पेपर मिल्सनी संभाव्य दरवाढीची पूर्वसूचना द्यावी, दरांमध्ये पारदर्शकता ठेवावी आणि पुरवठ्यात सातत्य राखावे, अशी मागणी त्यांनी केली.



ग्राहक उद्योगांनाही आवाहन
अन्नपदार्थ, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि ई-कॉमर्स क्षेत्रात कोरुगेटेड बॉक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे कागदाच्या दरवाढीचा परिणाम संपूर्ण पॅकेजिंग पुरवठा साखळीवर होऊ शकतो. ग्राहक उद्योगांनी वाढलेल्या खर्चानुसार बॉक्सच्या दरात योग्य सुधारणा स्वीकारावी, असे आवाहन WICMA ने केले आहे.



वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे विशेषतः लहान उत्पादकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे असोसिएशनने नमूद केले. या प्रश्नावर आंदोलन करण्याऐवजी संबंधित घटकांशी संवाद साधून तोडगा काढण्यावर भर असल्याचेही केडिया यांनी स्पष्ट केले. दरांमध्ये स्थिरता, पुरवठ्यात सातत्य आणि वाढलेल्या खर्चाचा योग्य समतोल साधल्यास उद्योगातील अनिश्चितता कमी होईल, अशी भूमिका असोसिएशनने मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top