, 4kNews कामोठे दि. 19पनवेल (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना भेटी देत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायाचे दर्शन घेतले. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी तसेच ग्रामीण भागातील विविध गणेशोत्सव मंडळांना त्यांनी भेट दिली. यावेळी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे स्वागत […]
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
4kNews कामोठे दि. 19पनवेल/नवी मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, ध्वज पथकाची दिमाखदार उपस्थिती आणि पारंपरिक वेशभूषेतील एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे विमानतळ परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. गणरायाच्या आगमनानिमित्त विमानतळावर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात ध्वज पथक, लेझीम पथक, अब्दागिरी आणि […]
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
4kNews कामोठे दि. पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या खारघर येथील ‘शिवनेरी’ महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाची आरती चाफेवाडी व फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील महिला, पुरुष तसेच चिमुकल्यांच्या शुभहस्ते भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत समाजातील सर्व घटकांना उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा कौतुकास्पद उपक्रम महापौर नितीन पाटील यांनी राबविला. आरतीनंतर […]
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
4kNews कामोठे दि. 18 पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. […]
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
4kNews कामोठे दि 18 पनवेल प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या Re Sustainability Limited च्या वतीने यंदा “पर्यावरणपूरक ग्रीन गणेशोत्सव – २०२६” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीचे संचालक सोमनाथ मलगर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत तब्बल ५,००० पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींचे मोफत वितरण करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक […]
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
4kNews कामोठे दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानीही गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सिद्धार्थ ठाकूर व त्यांच्या पत्नी पूर्वा […]
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
4kanews कामोठे दि. 18पनवेल (प्रतिनिधी) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा गेल्या ६५ वर्षांपासून अखंड जागर करणाऱ्या पनवेल येथील श्री. मदन कोळी परिवाराच्या गणेशोत्सवाला यंदाही भक्ती आणि कलात्मकतेची अनोखी जोड लाभली आहे. दरवर्षी आपल्या आकर्षक व वैविध्यपूर्ण देखाव्यांमधून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोळी परिवाराने यंदा ‘श्री नरसिंह अवतार’ […]
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
4kNews कामोठे दि. 17 उद्योगांची बँक हमी वाढविण्यासह प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा होणार अभ्यासपनवेल (प्रतिनिधी) : राज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच उद्योगांकडून घेतली जाणारी बँक हमी (डिपॉझिट रक्कम) वाढविण्याबाबत अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, […]
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
4kNews कामोठे 12 पनवेल (प्रतिनिधी) : शेतकरी कामगार पक्ष आणि एकता एज्युकेशनल अँड वेलफेअर असोसिएशन, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पटेल मोहल्ला येथील आरिफ पटेल जनसंपर्क कार्यालयात मोफत आयुष्मान भारत कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. १०) झालेल्या या शिबिरात सुमारे २५० नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेतला. माजी उपनगराध्यक्ष आरिफ […]
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
4kNews कामोठे 12 पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी नुकतीच शिवसेना महिला संपर्क संघटिका म्हणून नियुक्ती झालेल्या निधीताई शिंदे यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी निधी शिंदे यांनी महिला संघटन मजबूत करणे, नवीन महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, मतदार नोंदणी तसेच शिवसेना सभासद नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांनी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाप्रमुख […]
