नवीन बातम्या
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !
२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन
डाउन सिंड्रोमवर मात करत पार्थची समुद्री भरारी; सात वर्षीय आदीचा नवा विक्रम!
दोन्ही सख्ख्या भावांनी १८ किलोमीटरचे समुद्री अंतर केले पार; पार्थला ६ तास ५७ मिनिटे, तर आदीला ५ तास ५६ मिनिटे
किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन

शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ

4kNews कामोठे दि. 31

पनवेल (प्रतिनिधी) : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया कंपनीमध्ये कार्यरत सफाई कामगारांना दरमहा १३ हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या करारामुळे कामगारांना वेतनवाढीसह विविध सुविधा मिळणार आहेत.



करारानुसार, प्रत्येक कामगाराला तीन लाख रुपयांचे वैद्यकीय विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच सणासुदीसाठी १० हजार रुपये आगाऊ रक्कम, आपत्कालीन परिस्थितीत २० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत आणि पूर्ण पगाराच्या आधारे बोनस देण्याची तरतूद करण्यात आली आहे.



आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कराराची प्रक्रिया पार पडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, कंपनीचे प्लांट मॅनेजर सचिन गुप्ता, लीडरशिप टीमचे सदस्य विनीत कश्यप, ठेकेदार आशिष मोकल, शेखर सावंत, विद्याधर पाटील तसेच कामगार प्रतिनिधी जयराम काठे, भीम शिलकर, उत्तम म्हात्रे आणि अविनाश गायकर उपस्थित होते.
कामगारांच्या वेतनवाढीसह आरोग्य आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध सुविधा मिळवून देण्यासाठी संघटनेने केलेल्या प्रयत्नांना या करारामुळे यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top