नवीन बातम्या
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !
२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन
डाउन सिंड्रोमवर मात करत पार्थची समुद्री भरारी; सात वर्षीय आदीचा नवा विक्रम!
दोन्ही सख्ख्या भावांनी १८ किलोमीटरचे समुद्री अंतर केले पार; पार्थला ६ तास ५७ मिनिटे, तर आदीला ५ तास ५६ मिनिटे
किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन

किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन

4kNews कामोठे दि. 31

पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-३, पनवेल यांच्या वतीने ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ हा जनजागृतीपर कार्यक्रम २८ ऑक्टोबर रोजी पनवेल येथील अण्णासाहेब वर्तक सभागृहात आयोजित करण्यात आला. किशोरवयीन मुलींना सोशल मीडिया, ऑनलाइन चॅटिंग, वैयक्तिक माहिती व छायाचित्रे शेअर करणे तसेच ऑनलाइन ब्लॅकमेलिंग यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.



चैत्र फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे ४५० विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. चैत्र फाउंडेशनच्या संचालिका चित्रा मेटे यांनी चित्रफितींच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच सायबर सुरक्षेबाबत पोलिसांनी माहिती दिली, तर कराटे प्रशिक्षक दादा माने यांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.



पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त डॉ. प्रमोद शेवाळे, मोहिनीताई विक्रांत पाटील आणि डॉ. प्रीती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. किशोरवयीन मुलींमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करता यावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top