नवीन बातम्या
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !
२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन
डाउन सिंड्रोमवर मात करत पार्थची समुद्री भरारी; सात वर्षीय आदीचा नवा विक्रम!
दोन्ही सख्ख्या भावांनी १८ किलोमीटरचे समुद्री अंतर केले पार; पार्थला ६ तास ५७ मिनिटे, तर आदीला ५ तास ५६ मिनिटे
किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन
‘व्होट बचाओ, देश बचाओ’ आंदोलनातून काँग्रेसचा एल्गार मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी पनवेलमध्ये निदर्शने; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
हृदयाच्या मागील बाजूची १८ सेंटीमीटरची थायरॉईडची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढली मेडिकव्हर रुग्णालयात १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; दोन वर्षांपासून श्वासोच्छ्वासाच्या त्रासाने त्रस्त महिलेला दिलासा

महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन

4kNews कामोठे
पनवेल, दि.31(वार्ताहर) : दिवाळीच्या सुट्टीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य मोफत आयोजित करावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुलांमधील मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता त्यांना मनोरंजनासोबतच सांस्कृतिक अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.


यासंदर्भात २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात जाधव यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपक्रमाचा संदर्भ दिला आहे. पुणे महानगरपालिकेने मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांचा कल इतर उपक्रमांकडे वळविण्यासाठी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक मोफत उपलब्ध करून दिले होते. त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकेनेही दिवाळीच्या सुट्टीत बालनाट्याचे आयोजन करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
नाटकाच्या माध्यमातून मुलांना मनोरंजनासोबतच कला, संस्कृती आणि रंगभूमीची ओळख होऊ शकते. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी नाटक मोफत दाखविण्याची व्यवस्था करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top