नवीन बातम्या
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !
२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन
डाउन सिंड्रोमवर मात करत पार्थची समुद्री भरारी; सात वर्षीय आदीचा नवा विक्रम!
दोन्ही सख्ख्या भावांनी १८ किलोमीटरचे समुद्री अंतर केले पार; पार्थला ६ तास ५७ मिनिटे, तर आदीला ५ तास ५६ मिनिटे
किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘उडान… नवी आशा–नवी दिशा’ उपक्रम पनवेलमध्ये ४५० विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग; सायबर सुरक्षेसह स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन


उरण, दि.  31(विठ्ठल ममताबादे) : खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी व व्यवसायाच्या संधींमध्ये प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) कंपनीच्या प्रवेशद्वारावर गेट बंद आंदोलन सुरू करण्यात आले. कंपनी प्रशासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.



मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना आणि खोपटे-बांधपाडा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. कंपनी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना तातडीने कामावर घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कंपनीने पहिल्या टप्प्यात १० जणांना आणि तीन महिन्यांनंतर उर्वरित नऊ जणांना कामावर घेण्याची तयारी दर्शवली. आंदोलकांनी हा प्रस्ताव अमान्य करून सर्व १९ जणांना एकाच वेळी कामावर घेण्याची भूमिका घेतली. कंपनीने ही मागणी मान्य न केल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले.



कंपनीत पेण, अलिबाग आणि पनवेल तालुक्यांतील ७० हून अधिक व्यक्ती काम करीत असताना, कंपनीसाठी जमीन संपादित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. लोकल लेबर, सर्व्हेअर, हाऊसकीपिंग तसेच इतर कामांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे आणि कंपनीतील रोजगार व व्यवसायाच्या संधींमध्ये सातबारा धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.



यावेळी अजित म्हात्रे यांनी शासन निर्णयाचे पालन करून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. शिवसेना नेते बी. एन. डाकी यांनीही स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. रुपेश पाटील यांनी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.



या आंदोलनाला भाजप युवा नेते प्रशांत ठाकूर, बी. एन. डाकी, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर व कविता रुपेश पाटील, कामगार नेते रवी घरत, मनसे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, राजेंद्र म्हात्रे, रंगनाथ पाटील, विशाखा ठाकूर, प्रीती पाटील, अविनाश ठाकूर, किरण म्हात्रे, विश्वास पाटील, देवेंद्र पाटील, संतोष पाटील, कुमार ठाकूर, अलंकार पाटील आणि बबन ठाकूर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top