नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

यंदाही भव्य स्वरूपात ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन; मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक

पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील स्पर्धेप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात विविध क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव अर्थात ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली नियोजन बैठक पार पडली.


  उलवा नोडमध्ये झालेल्या या बैठकीस टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भार्गव ठाकूर, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपसरपंच विजय घरत, अमर म्हात्रे,  सुर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, किशोर पाटील, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, मयूर कदम, विवेक होन, खारघर युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेश पाटील, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबत विविध स्पर्धा समितीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांनी पुढे बोलताना सांगितले कि, सीएम चषक त्यानंतर मागील वर्षी नमो चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि खेळाडूंना वाव देणारी ठरली. नमो चषक २०२४ स्पर्धा राज्यातील प्रत्येक तालुक्यात संपन्न झाली.  त्या स्पर्धेत पनवेल विधानसभा मतदार संघात ०१ लाख १३ हजार २७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन पनवेलने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला होता.

मागील नमो चषक महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो-खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य, अशा २१ प्रकारात स्पर्धा झाल्या. यंदा नमो चषक २०२५ स्पर्धा अधिक उत्साहाने आणि भव्य स्वरूपात होणार आहे. विविध स्पर्धांसोबत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.  त्यामुळे या सर्व नमो चषक स्पर्धेचे यंदाही योग्य नियोजन व यशस्वी आयोजन झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक समितीने आपापल्या समितीचा नियमित आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी समित्यांना या बैठकीच्या माध्यमातून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top