नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

4kNews कामोठे
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः नवीन वीजमीटर जोडणी आणि रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्याच्या प्रस्तावाचा फिजिबिलिटी अहवाल तयार करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या तळोजा कार्यालयातील सहायक अभियंता रोहित रेवानंद मोरे (वय 32) याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ पकडले. अवघ्या 32 वर्षीय अधिकाऱ्याला कार्यालयातच लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्याने महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय 40) हे इलेक्ट्रिकल कंत्राटदार असून पी. एन. इलेक्ट्रिकल्स कंपनीकडून त्यांना महावितरणच्या नवीन वीजमीटर जोडणी व रोहित्र बसविण्याचे काम देण्यात आले होते. या कामासाठी आवश्यक असलेला फिजिबिलिटी अहवाल मिळावा म्हणून 7 जुलै रोजी महावितरणकडे अर्ज करण्यात आला होता. या प्रस्तावाची फाईल तळोजा कार्यालयातील सहायक अभियंता रोहित मोरे यांच्याकडे प्रलंबित होती.


तक्रारदार 10 जुलै रोजी कामाच्या प्रगतीची विचारणा करण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले असता, फिजिबिलिटी अहवाल तयार करून देण्यासाठी तसेच भविष्यातील इतर कोणत्याही फाईलवर कार्यवाही करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. लाच दिल्याशिवाय कोणत्याही फाईलवर काम करणार नसल्याचे मोरे यांनी सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला. त्यानंतर 13 जुलै रोजी तक्रारदाराने नवी मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली.
14 जुलै रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या पर्यवेक्षणाखाली, पोलीस उपअधीक्षक धर्मराज तुकाराम सोनके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने सापळा रचला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निता भोसले करीत आहेत.


त्यानुसार गुरुवारी (23 जुलै) दुपारी 1.12 वाजता तळोजा येथील महावितरण कार्यालयात रोहित मोरे यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये 500 रुपयांच्या 100 नोटांचा समावेश आहे. कारवाईनंतर आरोपीची अंगझडती घेऊन त्यांचा मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सरकारतर्फे या प्रकरणात पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे या फिर्यादी आहेत. आरोपीविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top