नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद


4kNews कामोठे
पनवेल, दि. २३ (वार्ताहर) : पळस्पे गावातील ब्राह्मण आळी येथील रहिवासी विजय सिताराम साबळे (वय ४५) हे कामोठे येथील सेक्टर ३५ मधील पिनॅकल रेसीडन्सी, प्लॉट क्रमांक २८ येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 



विजय साबळे यांचा रंग सावळा, केस काळे, बांधा मजबूत असून उंची पाच फूट सात इंच आहे. बेपत्ता होताना त्यांनी नारंगी रंगाचा टी-शर्ट व चॉकलेटी रंगाची पँट परिधान केली होती. त्यांच्या उजव्या हातात लाल धागा असून, त्यांच्याकडे काळ्या रंगाची बॅग आणि विवो कंपनीचा Y18e मोबाईल होता. 



त्यांच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास कामोठे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार ओ. जी. साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top