नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे

पनवेल शहर शाखा आणि संजीवनी नेचर केअर सेंटरचा संयुक्त उपक्रम
पनवेल, दि. 23(संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल शहर शाखा आणि संजीवनी नेचर केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने लाईन आळी येथील शिवसेना शहर शाखेत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



संजीवनी नेचर केअर सेंटरचे डॉ. विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरात अ‍ॅक्युप्रेशर (सुजोक), रिफ्लेक्सोलॉजी आणि चुंबक चिकित्सा यांसारख्या उपचारपद्धतींबाबत सेवा व मार्गदर्शन करण्यात आले. पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, मानदुखी, सायटिका, सायनस आणि मायग्रेन यांसारख्या त्रासांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.



या उपक्रमासाठी जिल्हाप्रमुख दीपक निकम, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, विभागप्रमुख प्रवीण जाधव, शहर संघटिका उज्ज्वला गावडे, विभाग संघटिका अश्विनी देसाई यांच्यासह शाखाप्रमुख आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top