नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान


4kNews कामोठे
पनवेल, दि. 23(वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी माझी देवालाही आवडे’ या संतगीतांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (१७ ऑक्टोबर) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.



पनवेल महानगरपालिकेच्या दशकपूर्तीनिमित्त महापौर नितीन पाटील यांचा रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांचाही गौरव करण्यात आला.
कल्पिता राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात संतगीते, सुमधुर गायन आणि नृत्याविष्कारातून मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा उलगडला. डॉ. राम पंडित आणि तन्वी गोरे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले, तर कल्पिता राणे यांच्या नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.



महापौर नितीन पाटील यांनी मनोगतात महापालिकेच्या स्थापनेत आमदार प्रशांत ठाकूर यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. महापालिकेच्या स्थापनेनंतर पनवेलच्या विकासाला गती मिळाली असून, आगामी काळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांचे अभिनंदन करून मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकार विकास मंचाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचेही आभार मानले.



कार्यक्रमाला नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधीक्षक आबासाहेब जगताप, मंचाचे सल्लागार माधव पाटील, डॉ. संजय सोनावणे, संजय कदम, मंदार दोंदे, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस हरेश साठे, खजिनदार दत्ता कुलकर्णी, प्रवीण मोहोकर, नितीन कोळी, निलेश सोनावणे आणि लालचंद यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top