4kNews कामोठे
पनवेल, दि. २३ (वार्ताहर) : जिनत बादशाहा शेख (वय २५) ही तरुणी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिचा शोध सुरू आहे.

जिनत शेख ही वावंजे, ता. पनवेल येथील रूम क्रमांक १०३ मध्ये राहते. तिचा चेहरा उभट, बांधा मध्यम, रंग गोरा, डोळे काळे व केस काळे आणि कुरळे आहेत. तिची उंची सुमारे साडेचार फूट आहे. बेपत्ता होताना तिने लाल रंगाचा टॉप, लेगिन्स आणि गुलाबी रंगाच्या सँडल घातल्या होत्या. तिला हिंदी, मराठी व इंग्रजी भाषा बोलता येतात.

तिच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तपास अधिकारी पोलीस हवालदार उदय वसंत भगत यांच्याशी ८१०८३३००६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

