4k समाचार
पनवेल (दि. 20 सप्टेंबर) – लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्रीचे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले. पनवेलकरांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३० स्टॉल्स या दोन दिवसीय उपक्रमात उभारण्यात आले होते. साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, ज्वेलरी, पर्स, साडी कव्हर, आचार, शोभेच्या वस्तू, नवरात्रीसाठी आकर्षक अॅक्सेसरीज, घागरे, तसेच लाइफ इन्शुरन्स अशा विविध प्रकारच्या स्टॉल्समुळे परिसरात खरेदीचा उत्साह दिसून आला.

या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. जिल्हा राज्यपाल यांच्या पत्नी लायन सौ. कीर्ती सुर्यवंशी, लायन संजय पोतदार व नीता माळी यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाहिले उपजिल्हा राज्यपाल लायन प्रवीण सरनाईक, लायन श्रुती सरनाईक, जिल्हा कॅबिनेट सेक्रेटरी लायन खेमा टेलर, लायन दीपाली टेलर, जिल्हा GMT लायन सत्यपाल चुग, रिजन चेअरपर्सन लायन धर्मपाल चुग, लायन संजय गोडसे, लायन डॉ. माने (तळोजा पंचानंद क्लब), लायन प्रमेंद्र बहिरा (पनवेल सरगम क्लब), तसेच विशेष अतिथी लायन विजयश्री पाटील (पनवेल रॉयल प्राईड क्लब) उपस्थित होते.

तसेच लायन भूमिका, लायन मोनिका, लायन सागर (ड्रोणागिरी क्लब), लायन उमेश (उलवे जेम्स क्लब) यांनीही भेट दिली.
प्रदर्शनाचे आयोजन अध्यक्ष लायन सुरभी पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी लायन अशोक गिल्डा (सचिव), लायन मंगला ठाकूर (१ली उपाध्यक्ष), लायन सुयोग पेंडसे, लायन प्रातिमा चौहान, लायन गौतम म्हसके, लायन विजयसिंगh परदेशी, लायन शोभा गिल्डा, लायन लेडी नूतन धोत्रे, लायन कुमारसिंग परदेशी या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला..

तसेच लायन एस. जी. चव्हाण, लायन मुरतुझा अफसर, लायन लेडी फरीदा अफसर यांचीही उपस्थिती होती.
या प्रदर्शनात वैद्यकीय तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. विशेष सहाय्याबद्दल नवरंग इव्हेंट्सचे आभार मानण्यात आले.
