4k सामाचार दि. 16
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल(अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा ८ ऑक्टोबर ते १६ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आली होती.

मुलांच्या गटातील या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य व मुंबई शहर झोन-१चे उपाध्यक्ष प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी केले. त्याचबरोबर मुंबई शहर झोन-१सचिव डॉ.मनोज वर्मा ,मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक व मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सह-सचिव पूनम मुजावर यांची उपस्थिती लाभली.

या स्पर्धेमध्ये ५१ महाविद्यालयातील मुलांच्या संघानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत दाखल झालेले पिल्लई महाविद्यालय, पी.व्ही.पी. महाविद्यालय, जि. एन. खालसा, आणि सरस्वती इंजिनीरिंग महाविद्यालय या प्रमाणे असून झालेल्या स्पर्धेमध्ये सरस्वती इंजिनीरिंग महाविद्यालयाणे चतुर्थ स्थान व जि.एन.खालसा महाविद्यालयाने तृतीय स्थान पटकावले तर पिल्लई महाविद्यालयाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम विजेते पद मिळवले आणि पी.व्ही.पी. महाविद्यालयाला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकरव प्रा. प्रतिज्ञा पाटील, जिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
