नवीन बातम्या
How to Create an Online Course Marketplace in WordPress (Multiple Instructors)
WordPress.org blog: WordPress Signs the Open Weights and American AI Leadership Letter
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार; ५० हजार रुपयांचे बक्षीस
पत्रकारांनी घेतली पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी भूखंडाची मागणी
कळंबोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन
Open Channels FM: X vs Nitter and XCancel, AI Middleware, and Accelerated Online College Degrees
आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर; पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन
‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा
३० ऑगस्टला पनवेलमध्ये माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे विशेष व्याख्यान
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना पनवेलतर्फे मोफत बस सेवा

बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी

 4knews दि. 25/12/25

पनवेल (प्रतिनिधी) हिंदी पखवाडा निमित्ताने नियंत्रक महालेखाकार कार्यालयाच्या प्रोटोटाइप, डिझाईन आणि डिझाईन नियंत्रक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मौलिक कविता स्पर्धा आणि बाल कविता संमेलनात उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूलची विद्यार्थिनी काव्या सिंगने चमकदार कामगिरी केली आहे. त्या अनुषंगाने तिला दिल्ली येथील मुख्य कार्यालयात उत्कृष्ट रचना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

          या स्पर्धेसाठी पॅनेल स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ‘मठ, शासकीय समुदाय, ऑपरेशन सिंदूर किंवा प्रतिभा संपदा’ या समकालीन विषयांवर मौलिक कविता स्पर्धा घेण्यात आली. सादर करण्यात आलेली कविता पूर्णतः मौलिक असावी व कोणत्याही कृत्रिम साधनांनी तयार केलेली किंवा बांधकाम/भवनातून प्रेरित नसावी अशी अट होती. हिंदी पखवाड्याच्या या उपक्रमात सौ. शकुंतला रामशेठ ठाकुर स्कूल सीबीएसई उलवे येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी काव्या सिंह हिने सहभाग घेतला. पहिल्या फेरीत संपूर्ण भारतातून सर्वोत्तम १०० विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड झाली. दुसऱ्या फेरीत ती सर्वोत्तम २५ विद्यार्थी मध्ये निवडली गेली. तिसऱ्या फेरीसाठी तिला दिल्ली येथील मुख्य कार्यालयात उत्कृष्ट रचनेसाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top