नवीन बातम्या
How to Create an Online Course Marketplace in WordPress (Multiple Instructors)
WordPress.org blog: WordPress Signs the Open Weights and American AI Leadership Letter
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार; ५० हजार रुपयांचे बक्षीस
पत्रकारांनी घेतली पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी भूखंडाची मागणी
कळंबोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन
Open Channels FM: X vs Nitter and XCancel, AI Middleware, and Accelerated Online College Degrees
आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर; पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन
‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा
३० ऑगस्टला पनवेलमध्ये माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे विशेष व्याख्यान
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना पनवेलतर्फे मोफत बस सेवा

चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

4knews दि. 25/12/25

माटुंगा, मुंबई येथील रूपारेल महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (रूपारेल क्रिडा उत्सव २०२५-२०२६) चे आयोजन केले होते. स्पर्धेचा मुख्य भाग असणा-या आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर क्रिकेट स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी ग्रामिण भागातील एकमेव महाविद्यालय म्हणून चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे अभिजीत ठाकूर (कर्णधार), सुमित नारंगीकर (उपकर्णधार), राजा सांवरी, लक्ष्मण वाघमारे, अजय तातरे, सुमित माळी, रतन दुमणे, जनार्दन गवंडी, दिनेश शीद, रोशन रोडपालकर, रोशन फडके, अस्मितक भगत, अतिश भगत, संजय पाटील, अनिकेत म्हात्रे आणि गुरूनाथ गवंडी या शिक्षकेतर सेवक खेळाडूंनी सहभाग घेतला तसेच मार्गदर्शक म्हणून प्रभाकर गोंधळी, मिलिंद सालवी व साई प्रसाद पाटील यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले.

चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी नेहमीच कला, क्रीडा, गुणवत्ता व संशोधन क्षेत्रांमध्ये आघाडीवर असतात दरवर्षी महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करतात. या वर्षीही या बहारदार कामगिरीमुळे सर्व शिक्षकेतर सेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्यI या कामगिरीचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवकवर्ग व विद्यार्थी यांनी विशेष अभिनंदन केले.

या स्पृहणीय यशाप्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी.डी. अघाव, महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षिका सौ प्रतिभा म्हात्रे, महाविद्यालयाचे मुख्य लिपीक, श्री. जी. के. सुर्वे यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.

तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरूणशेठ भगत, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते मा. श्री. परेश ठाकूर आणि संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ सदस्य यांनी विशेष अभिनंदन केले . प्राचार्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top