नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

*रिक्षा चालकच ठरला रिक्षा चोर; पनवेल शहर पोलीसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरास अटक करून १८ ऑटो रिक्षा जप्त केल्या*


पनवेल दि.१५(संजय कदम): पनवेल शहर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला अटक करून १२ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १८ रिक्षा बुलढाणा येथून जप्त करण्यात यश आले आहे. मुख्य मंझे हा रिक्षा चालवत असतानाच चोरीच्या रिक्षा हेरून तो त्या चोरी करत होता.


  पनवेल शहर परिसरातील व आजुबाजुच्या पोलीस ठाणे परिसरात दिवसेंदिवस रिक्षा चोरीच्या गुन्हयांच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज तपास, गुप्त बातमीदार व इतर प्रकारे शोध चालू असताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा नितीन वाघमारे, पोहवा महेंद्र वायकर व पोशि चंद्रशेखर चौधरी हे पोलीस ठाणे हददीमध्ये गस्त करत असताना गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपीशी साम्य असलेला संशयीत इसम दिसला. त्याला स्थानिक नागरीकांचे मदतीने ४ किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेवून विचारपूस केली.

यावेळी त्याने त्याचे नाव निसार सत्तार खान, (वय -३६ वर्ष, रा. कच्छी मोहल्ला, पनवेल) असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऑटो रिक्षा चोरी केल्याचे कबुल केले. नमुद आरोपीकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता आरोपीने सदर गुन्हयातील तसेच पनवेल शहर, कळंबोली, कामोठे पोलीस ठाण्याच्या परीसरातुन देखील सुमारे १ वर्षापासून १८ ऑटो रिक्षा चोरी केल्याचे कबुल करून सदर ऑटो रिक्षा या त्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका येथे विक्री केल्याचे सांगितल्याने. या आरोपीला अटक करून त्याने दिलेल्या माहीतीची शहानिशा करण्याकरीता बुलढाणा पोलीस पथक रवाना करण्यात आले होते. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने तालुका  मेहकर जिल्हा बुलढाणा येथे जावुन स्थानिक पोलीसांचे मदतीने विविध गुन्हयातील तब्बत १८ ऑटो रिक्षा ताब्यात घेवून त्याचा अभिलेख तपासला असता मिळालेल्या रिक्षापैकी १० ऑटो रिक्षा या पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हयातील, ४ ऑटो रिक्षा कळंबोली पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हयातील आणि ३ ऑटो रिक्षा या कामोठे पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले.

एका ऑटो रिक्षावरील इंजिन नंबर व चेसिस नंबर खोडण्यात आल्याने या रिक्षाबाबत अद्यापपर्यंत उपयुक्त माहिती प्राप्त झालेली नाही. अश्या प्रकारे कौशल्यपूर्ण तपस करून नवी मुंबई आयुक्तालयातील सुमारे १२ लाख ४५ हजार रूपये किंमीसमा १८ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून १७ ऑटो रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल पोलीसांना यश मिळाले आहे. सदर कामगिरी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकिर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग, पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे पकटीकरण पथकातील सपोनि प्रकाश पवार, पोउपनि विनोद लभडे, पोलीस हवालदार यशवंत झांझम, अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, अमोल डोईफोडे, महेंद्र वायकर, महेश पाटील, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, तुषार बोरसे, किरण सोनावणे, लक्ष्मण कटक (मेहकर पोलीस ठाणे), पोलीस नाईक विनोद देशमुख, मिथुन भोसले, पोलीस शिपाई किरण कराड, चंद्रशेखर चौधरी, विशाल दुधे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top