नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट

4kNews
पनवेल दि. 27  (वार्ताहर) : इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबने पनवेल येथील गुरुलिंगेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत आवश्यक सुविधा सुधारण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने ‘हॅपी स्कूल प्रोजेक्ट इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबने आयोजन केले.बहुतेक विद्यार्थी जवळच्या झोपडपट्ट्या आणि रेड-लाइट भागांमधून येतात,जिथे जागरूकता आणि पाठिंब्याच्या अभावामुळे शिक्षणाची संधी अनेकदा मर्यादित असते.हे लक्षात घेऊन,आमच्या उपक्रमाने त्यांच्यासाठी एक चांगले आणि अधिक प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करुन या प्रोजेक्टचे आयोजन केले गेले. 


क्लबच्यावतीने मराठी शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर,शिक्षणाला चालना देण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तके आणि ‘मेरी किताब’ची १०० पुस्तके आणि वर्गात आरामदायक वातावरण निर्माण करण्यासाठी एक पंखा भेट दिला.शालेय साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी एक कपाट उपलब्ध करून देण्यात आले.जेवण बनवण्यास आणि स्वच्छतेस मदत करण्यासाठी १०-लिटरच्या कुकरसोबत ताट,चमचे आणि ग्लास भेट दिले.त्याचवेळी विद्यार्थ्यांना फ्रुटीचेही वाटप करण्यात आले.यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट भूमिका परमार,सेक्रेटरी दिपा आडमुठे,आणि इतर  मेंबर  उपस्थित  होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top