नवीन बातम्या
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

4kNews कामोठे दि 18

पनवेल प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या Re Sustainability Limited च्या वतीने यंदा “पर्यावरणपूरक ग्रीन गणेशोत्सव – २०२६” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीचे संचालक सोमनाथ मलगर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत तब्बल ५,००० पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींचे मोफत वितरण करण्यात येत आहे.


गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा पावन सोहळा आहे. हा सण भक्तिभावाने साजरा करतानाच पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज ओळखून संचालक सोमनाथ मलगर यांच्या नेतृत्वाखाली Re Sustainability Limited ने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत कंपनीचे कर्मचारी, गृहनिर्माण संस्थांचे सभासद, शासकीय अधिकारी व नागरिकांना मोफत मूर्ती वाटप केले जात आहे. पनवेल महानगर पालिकेचे उपायुक्त गणेश शेटे ,सभागृह नेते प्रकाश बीनेदार , विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांच्यासह पनवेल महानगर पालिकेच्या कर्मचारी वर्गाला श्री मूर्ती देण्यात आल्या   यावेळी   एच  आर हेड  संदीप महाजन , सी एस आर हेडसतेज धीवर  ,सेफ्टी   हेड रामदास गोल्हार उपस्थित होते


प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्ती व रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी या मूर्ती नैसर्गिक माती, कोकोपीट, बियाणे व कंपोस्टपासून तयार करण्यात आल्या आहेत. विसर्जनानंतर या मूर्ती कुंडीत विसर्जित केल्यास त्यातून नवीन रोपाची निर्मिती होते.


“पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ आपली जबाबदारी नसून भावी पिढ्यांप्रती आपले कर्तव्य आहे,” असा संदेश देत संचालक सोमनाथ मलगर व Re Sustainability Limited ने सर्व नागरिकांना यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top