नवीन बातम्या
7 Best WordPress MCP Servers and Plugins in 2026 (We Tested Them All)
How to Convert Images to WebP in WordPress (Free, No CDN)
Open Channels FM: The Core Principles of the Open Web, Simplified
Free WPVibe Alternative: Easy MCP AI vs WPVibe (Pricing, Limits, Reviews)
WordCamp Central: WordCamp Sylhet 2026: No Swag, All Heart
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!

ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

4kNews कामोठे दि. 18

पनवेल (प्रतिनिधी)  विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानीही गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.



सिद्धार्थ ठाकूर व त्यांच्या पत्नी पूर्वा ठाकूर यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विधिवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. बाप्पाच्या आगमनाने ठाकूर कुटुंबीयांच्या निवासस्थानी आनंद, उत्साह आणि भक्तीचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. प्रतिष्ठापनेनंतर लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, छाया ठाकूर, भरतशेठ ठाकूर, रजनी ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा ठाकूर, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, विशाल ठाकूर, भूषण ठाकूर, पूनम ठाकूर, प्रतीक ठाकूर, योगिता ठाकूर, भारत ठाकूर, प्राप्ती ठाकूर, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर आदींनी श्री गणरायाचे मनोभावे पूजन करून आरती केली आणि बाप्पाचे दर्शन घेतले..



गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, कुटुंबीयांना एकत्र आणणारा, भक्तीभाव वृद्धिंगत करणारा आणि सामाजिक सलोखा दृढ करणारा उत्सव म्हणून त्याकडे पाहिले जाते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, यश आणि सर्व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top