4k समाचार
पनवेल | गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील गाढी नदीला महापूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून चिपळे येथील पुलाखालून प्रचंड प्रमाणात पाणी जात आहे. तसेच नांदगाव येथील पुलावरूनसुद्धा पाणी वाहू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या वस्त्यांवर पाणी शिरण्याचा धोका असल्याने आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे कळते.
