4k समाचार दि. 20
नवी मुंबई गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सामान्य नागरिकांसह नोकरदार वर्गालाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

महापे, कल्याण, एमआयडीसी परिसरात पाण्याचा जोरदार त्रास जाणवत असून नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका परिवहन बसमध्येच कंबरेपर्यंत पाणी शिरल्याने प्रवाशांच्या भीतीत भर पडली. प्रवाशांना सीटवर पाय वर करून बसावे लागले.
