4k समाचार दि. 17
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५. ३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे हे ९ वे वर्ष असून या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व लोकप्रिय गायिका बेला शेंडे आपल्या सुमधुर आवाजात सुश्राव्य गीतांची मैफल सादर करणार आहेत. त्यामुळे दीपावलीच्या आनंददायी वातावरणात बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांचा जल्लोष अनुभवण्याची संधी पनवेलकरांना लाभणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ कार्यालय, मार्केट यार्ड पनवेल, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल, अमोल स्टेशनरी, टिळक रोड पनवेल येथे मोफत प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन ८६६८३३२१५९, गणेश जगताप ९८७०११६९६४, वैभव बुवा ९०२९४१०६९९, किंवा आदित्य उपाध्ये ९३२४६०३४७३ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
