4k समाचार
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.
दिलीप कदम यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना पनवेल महानगरपालिका शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप नेते मा.आ.बाळाराम पाटील व इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी बोलताना शेकाप वाढविण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार असून तळागळातील लोकांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देवू, असे मत नवनिर्वाचित शहराध्यक्ष दिलीप कदम यांनी व्यक्त केले आहे.
