4k समाचार
पनवेल दि. 17 (संजय कदम) : दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुमित दसवते, ब्रिजेश बहिरा, यज्ञेश पाटील, समीप मोहोकर, संतोष वर्तले, चेतन म्हस्कर, सचिन भगत, भावेश शिंदे, रोशन जाधव, विजय बहिरा, संकेत दसवते, चिन्मय भगत, पवन बोर्डे, सचिन जाचक उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केदार भगत नेहमी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत असतात. असे सांगत केदार भगत यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारच्या वोकल फॉर लोकल या मोहिमेला आपण सर्वानी साथ देत जेव्हा आपण स्थानिक वस्तू घेतो तेव्हा आपण केवळ सामान विकत घेत नाही, तर एखाद्या कुटुंबाची आशा घरी आणतो भारतीय कारागीरांची मेहनत, स्थानिक उद्योगांची उमेद पुढे नेत असतो असे सांगत सणांच्या दिवसांत आपण सर्वांनी एक नवा संकल्प करूया. आपल्या प्रत्येक खरेदीत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊया असे आवाहन केले.
