4k समाचार
पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या कडून मंदिरातील दोन समई हस्तगत केल्या आहेत.

नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि गजाजन घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि अनिरुद्ध गिजे , पो उपनि हर्षल राजपूत ,पोहवा धुमाळ ,तांडेल ,कुदळे,बाबर ,देवरे , म्हारसे ,पोशि भगत, खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासा आधारे आरोपी अनेश रमेश कुमार ( वय ४३ ) याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून मंदिरातील दोन चोरीच्या समई हस्तगत केल्या आहेत.
