4k समाचार दि. 7
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या(अधिकारप्रदत्त स्वायत्त) इंटेरिअर डिझाईन विभागाच्यावतीने पनवेल मधील अग्निशमक विभागास शैक्षणिक भेट दिली.

विद्यार्थ्यांना या भेटीत अग्निशमन विभागातील तज्ज्ञ अधिकारी शुभम राठोड आणि शिवा अडे यांचे मार्गदर्शन मिळाले.त्यांनी आग लागल्याच्या वेळी वापरली जाणारी उपकरणे, फायर अलार्म सिस्टम्स, विविध प्रकारची फायर एक्स्टिंग्विशर्स आणि सुरक्षित इमारत डिझाईनमध्ये लागणारी फायर सेफ्टी यंत्रणा याबाबत सविस्तर माहिती दिली. ही माहिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी तसेच भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना फायर फायटिंग सेवा, सुरक्षा प्रणाली तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या उपाययोजना याविषयी प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे आणि व्यावहारिक अनुभव प्राप्त करून देणे हा होता. या शैक्षणिक भेटीत इंटेरिअर डिझाईन विभागाच्या विभागप्रमुख प्रा. ए.आर. प्रज्योती देसाई व प्रा. ए. आर. विनय गावंड यांच्यासह एकूण २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले
