4k समाचार
कामोठे, ता.6 (बातमीदार) : शंभो मित्र मंडळ, कामोठे यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाची यंदाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणरायाच्या पवित्र पाटपूजनाने करण्यात आली.

हिंदुत्वाची शान आणि संस्कृतीचा अभिमान या संकल्पनेतून हा भावनिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.
पूजनानंतर मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना ब्लूटूथ स्पीकर आणि घरघंटी अशा उपयोगी भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

या विशेष कार्यक्रमास माजी नगरसेवक विकास घरत, अक्षय देवकर व खिमजीभाई देवडा उपस्थित होते.
उत्सवाचं सौंदर्य नव्या दृष्टिकोनातून या संकल्पनेचा प्रत्यय देत, मंडळाने सामाजिक सहभाग आणि समतेचा संदेश दिला.
