नवी मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग ४ व ४अ च्या टप्पा-१ प्राधान्य विभागावर आज तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या वतीने या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तांत्रिक प्रणालींचे पुनरावलोकन केले जाणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, उड्डाणपूल मार्गिका आणि ओव्हरहेड इक्विपमेंटसह अन्य सुविधा पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
