पनवेल (4kNews) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ तळोजे मजकूर योगीनगर धोंडली यांच्यावतीने ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवानिमित्त श्रीस्वामी समर्थ मठ मंदिरात शास्त्रीय व अभंगवाणीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात आसाम येथील गायिका श्रुती बुजरबुरुहा यांनी राग दुर्गामध्ये बडा खयाल व छोटा खयाल घेऊन ‘श्रीराम चंद्रकृपालु’ तसेच ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हे दोन अभंग सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. त्यांनतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांनी राग खमाज तसेच राग देश मधील द्रुत बंदिशी सादर करून भजन परंपरा कायम राखून ‘रूप पाहता लोचनी आणि ‘स्वामी कृपा कधी करणार’ हे भैरवीतील भजन सादर करत श्रोत्यांची वाहवा मिळवून त्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला पखवाजवर उत्तम अशी साथ दिली ती ऍड. सूरज गोंधळी यांनी. तबला साथ किशोर पांडे, हार्मोनियम तसेच टाळ वरती मंदार दीक्षित व गुरुदास कामत यांनी उत्तम साथ केली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवनाथ भाग्यवंत यांनी केले. या कार्यक्रमाला एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी सुहास कुंभार, तळोजे मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पाटील, अशोक पाटील, गायक ओम बोंगाणे, वैभव कडू, डॉ. प्रताप पाटील, विनोद तोडकर, अक्षय चौधरी, वैभव चौधरी, गायिका उषा पाटील, विलास खानावकर,
