नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत आणि समाधान

पनवेल (प्रतिनिधी)तळोजा फेज १ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम रविवारी संपन्न झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरीकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली. येत्या ३ महिन्यांनतर पुन्हा एकदा या सर्व विषयांवर आढावा घेणार तसेच येत्या १ महिन्यांच्या आत या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरु करून नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले.  त्याचबरोबरीने नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी पुढाकार घेऊन सोडवतील असेही त्यांनी नागरिकांना आश्र्वासित केले.


पनवेल महानगरपालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम करण्यात आला आहे. त्यानुसार तळोजा परिसरातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोजा फेज १ सेक्टर ९ मधील उद्यानामध्ये ‘आमदार आपल्या दारी’ हा कार्यक्रम झाला. यावेळी नागरिकांनी सुरक्षा, पाणी टंचाई, नदी प्रदुषण, डेब्रीज, स्ट्रीट लाइट, बस डेपो, हवा प्रदुषण, क्रिकेट ग्राऊंड, रस्ते, भाजी मार्केट, गार्डन, रस्यांवरील खड्डे, प्रॉपर्टी टॅक्स, साफ सफाई, सबवे मेंटनंस, स्पीड ब्रेकर, पाणी पुरवठा, पब्लीक हेल्थ सेंटर यासह विविध विषय नागरिकांनी मांडले. 

या सर्व प्रश्नांचे उत्तर देत लवकरात लवकर या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार, तीन महिन्यांनंतर या सर्व प्रश्नांचा पुन्हा एकदा आढावा घेणार असल्याचे सांगीतले. आणि प्रत्येक महिन्यामध्ये एका शहरात आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबवणार तसेच लेखी स्वरुपात ज्यांनी प्रश्न विचारला आहे, त्यांना १० दिवसांमध्ये उत्तर देणार असल्याची माहिती दिली. एकूणच नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. त्यामुळे या उपक्रमाचा नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.


या कार्यक्रमावेळी वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, निर्दोश केणी, संतोष पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, महिला मोर्चाच्या आशा बोरसे, ऍड. चेतन जाधव,  यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top