नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

आमदार प्रशांत ठाकूर यांची सामन्यांना भेट; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

पनवेल (प्रतिनिधी) रोटरी प्रांत ३१३१ मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग या स्पर्धेत बीकेसी संघाने प्लॅटिनम करंडक पटकाविला तरी  बाश्री संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचा सांगता व पारितोषिक वितरण सोहळा रविवारी कळंबोली येथील मैदानात झाला.  पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दरम्यान, स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला व आयोजकांचे कौतुक केले.



या स्पर्धेत बीकेसी संघाने प्लॅटिनम करंडक पटकाविला व बाश्री संघ उपविजेता ठरला. गोल्ड करंडक हा प्राईम दादा संघाने जिंकला व उपविजेतेपद आर.आर. संघाने मिळवले, तर सिल्वर करंडक पिंपरी इलिट संघाने प्राप्त केले व रिवेल संघ उपविजेता ठरला.

त्याचबरोबर स्पर्धेतील मालिकावीर प्रशांत तेलंगे, उत्कृष्ट फलंदाज दिग्विजय मोहिते, उत्कृष्ट गोलंदाज विजय कोतवाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक योगेश वाघ, उत्कृष्ट यष्टीरक्षक महेश उरणकर, ५० वर्षावरील मालिकावीर गणेश कडू, सर्वाधिक षटकार प्रितम कैया, सर्वोत्तम झेल डॉ. आमोद दिवेकर हे ठरले.  पारितोषिक वितरण समारंभास श्रेयस दिक्षित, हर्मेश तन्ना, डॉ. आमोद दिवेकर, वसंत कोकणे, प्रशांत तुपे आदी उपस्थित होते. रोटरी सदस्यांनी या स्पर्धेत आपले क्रीडा कौशल्य दाखवत क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top