नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

4kNews कामोठे  दि. 6
पनवेल (प्रतिनिधी) : येथून प्रकाशित होणाऱ्या ‘माझं पनवेल’ वृत्तपत्राच्या १३व्या दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.



या वेळी लोकनेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, ‘माझं पनवेल’चे संपादक विशाल मनोहर सावंत, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दीपक घोसाळकर, भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्यासह संतोष सुतार, मयूर तांबडे, संतोष भगत, अनिल कुरघोडे, सुनील पाटील, साबीर शेख, तुकाराम आवळे, रवींद्र गायकवाड, आशिष साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



मनोगत व्यक्त करताना रामशेठ ठाकूर म्हणाले की, ‘माझं पनवेल’ हे नाव वाचताच प्रत्येकाला आपल्या पनवेलचा अभिमान वाटतो. या नावातून आपल्या शहरासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. दिवाळी विशेषांकात दर्जेदार लेख, कथा आणि विचारांना स्थान देण्यात आले आहे. त्यांनी संपादक विशाल सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त पनवेलमधील साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातून संपादक विशाल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top