नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञान मंदिर कळंबोली.

4kNews कामोठे दि. 29

*उत्सव लोकशाहीचा*
भारत हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला लोकशाही प्रधान देश आहे.  भारत देशाचा कारभार लोकशाही मार्गाने कसा चालतो, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणुका  घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी ते सातवी मधील काही विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. त्यांच्यापैकी एका विद्यार्थ्याची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. निवडणुकीसाठी दोन बूथ तयार करण्यात आले. ही प्रक्रिया पार पडण्यासाठी  दोन केंद्रप्रमुख निवडण्यात आले . प्रत्येक मतदान केंद्रासाठी P-1,P-2 P-3 व त्यांना मदत करण्यासाठी दोन दोन सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली जावी याचे मार्गदर्शन श्री उध्दव कदम सर यांनी केले.  


निवडणूक विभागाने रीतसर नोटीस काढून सोमवार दिनांक 20/07/2026 रोजी निवडणुकीची सूचना काढण्यात आली . मंगळवार दिनांक  21/07/2026 विद्यार्थ्यांनी वर्ग प्रतिनिधी साठी आपले उमेदवारी अर्ज भरले. बुधवार वार दिनांक 23/07/2026 रोजी ज्यांना वर्ग प्रतिनिधी या निवडणुकीतून माघार घ्यायची आहे, त्यांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले. गुरुवार दिनांक  24/07/2026 वर्ग प्रतिनिधी होऊ  इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या वर्गात प्रचार केला. व मलाच वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून का द्यावे  याची माहिती दिली? आणि शुक्रवार दिनांक 25/07/2026 रोजी वर्ग प्रतिनिधी निवडणूक कार्यक्रम अतिशय छान वातावरणात घेण्यात आला. विद्यालयात तयार केलेल्या निवडणूक आयोगाने त्यांचे काम अतिशय छान पद्धतीने पार पाडले . सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापली कामे प्रामाणिकपणे केली .   

  निवडणूक आयुक्त म्हणू काम करणारा विद्यार्थी चि. रविराज गोफणे याने निवडणूक आयुक्ता म्हणून ही सर्व प्रक्रिया अतिशय छान पद्धतीने हाताळली .
त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकीचा निकाल प्रत्येक वर्गात निवडणूक विभागाने मत पेट्या नेऊन मत पेट्या फोडून मोजणी करून विजयी उमेदवार जाहीर केले .
या वर्ग प्रतिनिधी निवडणुकीस विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ संजना बाईक मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले अशा पद्धतीने अतिशय छान वातावरणात निवडणुका पार पडल्या व विद्यार्थ्यांना आपल्या देशात लोकशाही कशा पद्धतीने राबवली जाते निवडणुका कशा घेतल्या जातात याची माहिती मिळावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top