4k समाचार
पनवेल दि.१५(वार्ताहर): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी शिवसेना शहर शाखेत गेली सहा वर्ष 15 ऑगस्ट 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खांदा कॉलनीचे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर, उपविभाग संघटक सुनील महामुनी, उपशहर संघटक शिवाजी बंडगर उपविभाग प्रमुख सचिन धाडवे शाखाप्रमुख सुनील आवटि, राजू डेरे, दीपक चांदिवडे, शशिकांत सोनवणे, महिला संपर्क, खंदा कॉलनी अर्चना शिरसागर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि खांदा कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
