4k समाचार
उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )भेंडखळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय हिरामण ठाकूर यांचे सुपुत्र काँग्रेस युवा कार्यकर्ता लंकेश हिरामण ठाकूर यांची १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याशी एका कंपनीमध्ये युनियन संदर्भात भेट झाल्यानंतर त्यांची ओळख झाली.तदनंतर महेंद्रशेठ घरत यांनी आजपर्यंत अनेक युवकांना सोबत घेऊन युवकांना विविध उपक्रमात, कार्यक्रमात नेहमी अग्रेसर ठेऊन युवकांना महेंद्रशेठ घरत यांनी प्राधान्य दिले आहे. म्हणूनच संघटनेमध्ये लंकेश ठाकूर यांना सोबत घेतले.आज पंधरा वर्ष कामगार संघटनेमध्ये काम करत असताना एन. एम. जी. के. एस. संघटनेच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये मध्ये आयटीएफ च्या मीटिंगसाठी जाण्याचा योग लंकेश ठाकूर यांना आला.

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आजपर्यंत अनेकांना परदेशवारीची संधी उपलब्ध करून दिली. त्याच प्रमाणे अनेकांना रोजगार, किंवा कामगारांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवून अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. असे महेंद्रशेठ यांच्या तालमीमध्ये शिकलेले विश्वासू सहकारी लंकेश ठाकूर यांना सायप्रस- युरोप येथे दिनांक १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघाच्या मीटिंगसाठी एनएमजीकेएस संघटनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी त्यांची निवड केली आणि ती निवड लंकेश ठाकूर यांनी सार्थकी ठरवली.परिस स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते तसे महेंद्रशेठ घरत यांच्या स्पर्शाने अनेकांसोबत लंकेश ठाकूर यांचे सोने झाल्याचे पाहवयास मिळते.
