4k समाचार
उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील लोकप्रिय उरण एज्युकेशन सोसायटी शाळा आणी ज्यू. कॉलेज मध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणागिरी भूषण, समाज सेवक विकास कडू हे उपस्थित होते.ते उरण एज्युकेशन सोसायटीचे पालक शिक्षक संघचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत.कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलंन झाले.व पाहुणचे मनोगता नंतर प्रमुख पाहुणे विकास कडू यांचा मोठा सन्मान करण्यात आला.

त्या नंतर मुलांचे सुंदर नूत्यही झाले. मुलांनी उत्तम पद्धतीने सुंदर नूत्य सादरीकरण केले. तसेच १२ वीच्या विद्यार्थांनी आरक्षण या विषयावर छोटीशी नाटिका रुपी वाद विवाद कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे विकास कडू यांनी आपले मनोगत मांडताना म्हणाले की मी आपल्या शाळेचा ऋणी आहे की त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले ते पुढे म्हणले की या उरण मधील सर्वोत्तम शाळा मध्ये ही उरण एज्युकेशन सोसायटी शाळा आहे या शाळेत सर्वजण मोठया उत्साहाने विविध उपक्रम साजरे करत असतात.

या शाळे बद्दल बोलायचे झाले तर मी चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड च्या माध्यमातून बऱ्याच शाळाना भेट देतो परंतु यूईएस ही एक शाळा नसून एक कुटूंब आहे मला असे आढळून आले की या शाळेत शिक्षक फार गुणी व मेहनती आहेत या शाळेत खूप चालल्या प्रकारे शीस्त आहे, शेवटी ते मुलांना सांगत होते की हिंदी हा विषय कधीही भयंकर समजू नका उलट हिंदी हा विषय फार गोड आहे. ही हिंदी भाषा आपल्या देशाच्या काना कोपऱ्यात बोलली जाते.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळा ज्यू कॉलेजच्या प्रॅन्सिपल सिमरन दहीया, मीनाक्षी गुप्ता ,नयना सिंग , रेश्मा पाटील , गणेश जाधव, मिलिंद सर यांनी विशेष मेहनत घेतली.शेवटी शिक्षकांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमांची सांगता केली.
