नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली मध्ये आरोग्य शिबिर


पनवेल ता.9 ( बातमीदार) कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर व सिद्धिविनायक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी ता.9 रोजी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले हीते.

साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याच्या मानस ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी हार,तुरे व बॅनबाजीला फाटा देत आरोग्य शिबिराचे आयोजन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करुन निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छां दिल्या. या निमित्त आरोग्य शिबीरा मध्ये संपूर्ण रक्त गणना, मूत्रपिंड कार्य परीक्षण, लिपिड प्रोफाइल, रँडम ब्लड शुगर, (अकस्मात रक्तातील साखर)हृदय विद्युतलेखी (ईसीजी) क्ष-किरण (एक्स-रे) सामान्य शारिरिक सपासणी,बालरोग स्त्रीरोग तपासणी,मधुमेह रूग्णांना विशेष मार्गदर्शन तसेच सी.बी.सी, शुगर, बी.पी, वजन, ऊंची,बीएमआय. इत्यादी तपासण्या करण्यात आल्या व मोफत औषधे देण्यात आली.

मावळ चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी अत्यंत कमी वेळात अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात आला या बद्दल रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे आणि सर्व पदाधिकारी यांचे भ्रमणध्वनीवर कौतुक केले. मोफत आरोग्य तपासण्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणे विषयी सुंदर काम कोणतेही नसून या अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.

या आरोग्य शिबिरात शेकडो लोकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली.या आरोग्य शिबिरासाठी सिद्धीविनायक हाॅस्पिटल डॉ. संजय कदम एमडी (मेडिसिन) डॉ. पल्लवी कदम एमएस (शल्यचिकित्सक) डॉ. नैना पटेल एमएस (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांचे सहकार्य मिळाले या वेळी शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. शिबिरादरम्यान रुपेश ठोंबरे, विनोद साबळे,डीएन मिश्रा, विलास कदम, सुनील गोवारी विशाल पवार यांनी उपस्थिती दर्शविली सदर चे शिबीर यशस्वी करण्यासाठी कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, संजय शेडगे,निलेश दिसले, सिद्धेश म्हात्रे, दिपक कारंडे, सुमित सुर्यवंशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top