नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन

, 4kNews कामोठे दि. 19
पनवेल (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना भेटी देत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायाचे दर्शन घेतले.



पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी तसेच ग्रामीण भागातील विविध गणेशोत्सव मंडळांना त्यांनी भेट दिली. यावेळी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. मंडळांनी आयोजित केलेल्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.



याशिवाय नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेऊन त्यांनी आरती केली व सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली.
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून, या माध्यमातून समाजातील सलोखा अधिक दृढ व्हावा, अशी भावना व्यक्त करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top