नवीन बातम्या
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

शिव मावळे करंजाडे यांच्या माध्यमातून किल्ले रायगड वर स्वच्छता मोहीम.


4k समाचार
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर्ती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

ह्या मोहिमेमध्ये शिव मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात सुनील अंबावडे, राकेश कुसळे, अविनाश ठोसर, प्रशांत शेट्टी,अमर कुसळे, शंतनू कदम, रोहन शिर्के, सुरेश बार्वे,सतिश चालगे,दिनेश टीमगिरे, समीर कांबळे,अमर सावंत,विवेक शिंदे,सिद्धांत अंबावडे,ओंकार,आनंद पुजारी, अथर्व,सत्यजित पाटील आदी मान्यवरांनी ह्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. ह्या वेळेस सत्यजित पाटील यांनी असे सांगितले की माझा किल्ला माझी जबाबदारी  म्हणून प्रत्येकाने गड किल्ले स्वच्छ केले पाहिजेत. गड किल्ल्यांची काळजी घेत गड किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण केले पाहिजे.आणि हे गडकिल्ले जर स्वच्छ नसतील तर काय उपयोग म्हणून सर्व तरुणांनी एकत्र येऊन गडकिल्ले हे स्वच्छ केले पाहिजे. तरी प्रत्येकाने माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना राबवावी.असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top